शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

चुकून महादेवाच्या पिंडीवर चढवू नये या वस्तू

महादेव मनातील इच्छा लवकर पूर्ण करतात असे आपण ऐकले असेल परंतू यांची आराधना करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. महादेवाच्या पिंडीची पूजा करताना काही वस्तू चुकूनही अर्पित करू नये. जाणून घ्या काय आहे या वस्तू:
शंखाने चढवू नये पाणी: महादेवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचे वध केले होते. शंखाला याच राक्षसाचे प्रतीक मानले आहे, जे विष्णूचे भक्त आहे. म्हणून विष्णूची पूजा शंखाने होते परंतू महादेवाची नाही.
 
तुळस: प्रभू विष्णूने तुळशीला पत्नी रूपात स्वीकार केले आहे म्हणून महादेवाला तुळस अर्पित केली जात नाही.
 
तांदळाचे तुकडे: अक्षता म्हणून अख्खे तांदूळ अर्पित केले पाहिजे. तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतात म्हणून असे तांदूळ महादेवाला अर्पित करू नये.
 
हळद कुंकू: हळद- कुंकू सौभाग्याचे प्रतीक आहे जेव्हाकी महादेव वैरागी आहे म्हणून त्यांना कुंकू चढवतं नाही.
 
नारळ पाणी: नारळाचे पाणी देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे महादेवाला अर्पित केले जात नाही.