गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जून 2020 (12:56 IST)

योगिनी एकादशी व्रत कथा

योगिनी एकादशी व्रत कथेचा उल्लेख पद्मपुराणाच्या उत्तराखंडमध्ये आढळतं. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या कथेचे वर्णन श्रीकृष्ण आणि मार्कंडेय आहे. प्रेक्षक युधिष्ठिर आणि हेममाळी असे. जेव्हा युधिष्ठिर ज्येष्ठ कृष्ण एकादशीचे नाव आणि महत्त्व विचारतात, तेव्हा वासुदेव त्यांना ही गोष्ट सांगतात.
 
मेघदूतामध्ये महाकवी कालिदास यांनी एका शापित यक्षांबद्दल सांगितले आहेत. मेघदूतामध्ये ते यक्ष मेघालाच दूत समजून आपल्या बायकोला निरोप पाठवतात. कालिदासांची मेघदूताची कथा या कथेपासून प्रभावित असल्याचे म्हटले आहे. 
 
हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या उपवासाचे महत्त्व आहे. दर वर्षी 24 एकादशी असतात. त्यामधील ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षाच्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. हा उपवास केल्याने सर्व पाप नाहीसे होतात. ही एकादशी या लोकात आनंद आणि इतर लोकात मुक्ती देणारी आहे. ही एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रख्यात आहे.
 
कथा
एकदा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की मी एकादशीच्या व्रताचे महत्त्व ऐकले असून मला ज्येष्ठ कृष्ण एकादशीची गोष्ट सांगावी. त्याचे नाव काय आहे ? त्याची महत्ता काय आहे ? हे देखील सांगावे.
 
श्रीकृष्ण म्हणाले की हे राजन ! ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशीलाच योगिनी म्हणतात. हे व्रत केल्याने सर्व पाप नाहीसे होतात. ही या लोकामध्ये आणि परलोकामध्ये मुक्ती देणारी आहे. ही तिन्ही जगामध्ये प्रसिद्ध आहे. मी आपल्याला पुराणामध्ये वर्णन केलेली कथा सांगतो, ती आपण लक्षपूर्वक ऐकावी.
 
स्वर्गंधामच्या अलकापुरी नगरात कुबेर नावाचा शिवभक्त राजा राहत होता. राजा दररोज शिवाची पूजा करत होते. हेम नावाचा माळी त्यांच्याकडे दररोज पूजेसाठी फुले घेऊन  यायचा. हेमची विशालाक्षी नावाची सुंदर बायको होती. एके दिवशी तो मानसरोवराला जाऊन फुले घेयला गेला असताना कामातुर झाल्यामुळे आपल्या बायकोसोबत कामानंद घेऊ लागतो. येथे राजा त्याची आतुरतेने दुपार होईपर्यंत वाट बघत असतो. शेवटी राजा आपल्या सेवकांना माळीच्या न येण्याचे कारणे शोधून काढण्याची आज्ञा देतो.
 
राजाचे सेवक राजाला सांगतात की तो माळी फार कामुक प्रवृत्तीचा असून तो आपल्या बायकोसोबत विलास करण्यात रमला आहे. हे ऐकल्यावर कुबेर त्याला संतापून बोलवून घेतात. 
 
हेम माळी घाबरत राजा समक्ष येतो. तेव्हा राजा त्याला म्हणतात की हे पापी ! कामी तू माझ्या परम पूजनीय देवांचे देव महादेवाचे अनादर केले आहेत. म्हणून मी तुला श्राप देतो की तुला आपल्या बायकोचे वियोग सहन करावे लागणार आणि मृत्युलोकात जाऊन तू कुष्ठरोगी होशील.
 
कुबेराने दिलेल्या श्रापामुळे हेम माळी स्वर्गातून पृथ्वीवर येऊन पडतो आणि त्याच क्षणी त्याला पांढरा कुष्ठरोग होतो. त्याची बायको देखील लुप्त होते. मृत्युलोकामध्ये येऊन त्याला फार कष्ट सोसावे लागतात. भयंकर अरण्यात जाऊन अन्न पाणी न घेता वण वण फिरावे लागते. रात्रीला झोप देखील येत नसे, पण शंकराच्या पूजेच्या प्रभावामुळे त्याला गतजन्माच्या आठवणी येत होत्या. 
 
एके दिवशी तो ऋषी मार्कंडेयच्या आश्रमात जाऊन पोहोचतो. जे ब्रह्माहून वयाने फार ज्येष्ठ असे आणि ज्यांचे आश्रम ब्रह्माच्या आश्रमा सारखे दिसत होते. हेम माळी जाऊन त्यांचा पायांमध्ये लोटांगण घालतो.
 
त्याला बघून ऋषी मार्कंडेय म्हणतात की आपण असे काय पाप केले आहेत ज्याची शिक्षा आपण भोगत आहात. तेव्हा हेम माळी घडलेला प्रकार सांगतो. त्यावर ऋषी मार्कंडेय म्हणतात की तू माझ्या समोर सर्वकाही खरे सांगितले आहेस, म्हणून मी तुला तारण्यासाठी एक उपवास सांगत आहे. 
 
जर तू ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची योगिनी एकादशीचे विधी विधान उपवास करशील तर तुझे सर्व पाप नाहीसे होतील. हे ऐकून हेममाळी प्रसन्न होऊन ऋषींना साष्टांग नमस्कार करतो. मुनी त्याला प्रेमाने आपल्या जवळ करतात. हेम माळी ऋषीने सांगितल्याप्रमाणे विधी विधानाने योगिनी एकादशीचे उपवास करतो. या व्रतामुळे पुन्हा त्यांच्या रूपात येतो आणि आपल्या बायकोसोबत आनंदाने नांदू लागतो. 
 
भगवान श्री कृष्ण म्हणतात की हे राजन! हे योगिनी एकादशीचे व्रत 88 हजार ब्राह्मणांना जेवू घालण्या इतके फळ देतं. हा उपवास केल्याने प्राण्यांचे सर्व पाप नाहीसे होऊन शेवटी स्वर्गाची प्राप्ती होते.