रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. होळी
Written By वेबदुनिया|

होळी खेळल्यानंतर काय करावे?

WD
खूप जणांना रंग खेळायला आवडते. त्यात चुकीचे काही नाही. पण त्याचबरोबर रंगांमुळे त्वचेचे नुकसान तर होणार नाही ना? अशी भीतीही असते. पण आता तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही मनसोक्त रंग खेळू शकता. कारण काही अशा घरगुती वस्तूंच्या मदतीने आपण आरामात रंग काढू शकता, मग आता वेळ व घालवता रंग खेळण्यासाठी तयार व्हा.

* बेसनात लिंबू व दूध टाकून त्याची पेस्ट बनवून त्वचेला लावा. 10-15 मिनिटे पेस्टला तसेच राहू द्या. मग कोमट पाण्याने तोंड-हाथ धुऊन टाका.

* काकडीच्या रसात थोडं गुलाबपाणी आणि एक चमचा सिरका टाका आणि त्याची पेस्ट तयार करून त्याने तोंड धुतल्याने चेहर्‍याला लागलेले सर्व रंग दूर होऊन त्वचा उजळेल.

*मुळ्याचा रस काढून त्यात दूध व बेसन किंवा मैदा टाकून पेस्ट बनवून चेहर्‍याल लावल्याने रंग निघून जातील.

* त्वचेवर जास्त डार्क रंग लागला असेल तर दोन चमचे झिंक ऑक्साअड आणि दोन चमचे कॅस्टर ऑईल मिसळून लेप लावून चेहर्‍यावर लावावे. आता स्पंजाने रगडून चेहरा धुऊन टाकावा. आणि नंतर 15-20 मिनिटाने साबण लावून चेहरा धुऊन टाकावा, तुमचा चेहरा उजळेल.

* जवसाचा आटा आणि बदामाचे तेल मिक्स करून लावावे. त्याने सुद्धा रंग निघून जातो.

* दुधात थोडीशी कच्ची पपई वाटून मिसळून घ्यावी. त्यात थोडीशी मुलतानी माती व थोडंसं बदाम तेल टाकावे आणि अर्ध्या तासाने चेहरा धुऊन टाकावा.

* संत्र्याच्या साली आणि मसुराची डाळ व बदामाला दुधात टाकून त्याची पेस्ट बनवावी, या तयार पेस्टला संपूर्ण त्वचेला लावावे आणि धुऊन टाकावे. तुमची त्वचा एकदम चमकदार होऊन जाईल.