रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन
Written By वेबदुनिया|

आधी प्रांतावर प्रेम गरजेचे- बाळा नांदगावकर

आपण ज्या प्रांतात रहातो त्या प्रांताची माती आपली मातृभूमी आहे. त्या प्रांताचा अभिमान प्रत्येक माणसाच्या मनात असलाच पाहिजे. देशाची प्रगती ही प्रत्येक माणसांच्या मनात असलीच पाहिजे. पण देशाची प्रगती प्रत्येक माणसाच्या घरापासून होते. आधी घराची प्रगती मग गावाची, मग प्रांताची आणि मगच देशाची प्रगती शक्य आहे. आपण जर आपल्या प्रांतावर प्रेम न करता, आपल्या प्रांताच्या प्रगतीचा विचार न करता सरळ देशाच्या प्रगतीचा विचार केला तर ते कसे शक्य आहे? आधी आपण ज्या मातीत राहिलो, ज्या मातीत वाढलो त्यांच्यावर प्रेम करायला शिकले पाहिजे. देशावर प्रेम आपोआप जडेल.

आकाशवर प्रेम आहे, हे दाखविण्यासठी कुणी घर सोडून मोकळ्या आकाशाखाली उघड्या जमिनीवर झोपत नाही. आकाशावर प्रेम आहे हे दाखविण्यासाठी त्याला प्रेमाने न्याहाळले तरी पुरे. नाही तर उघड्या जमिनीवर झोपणार्‍याला लोक वेडा म्हणण्यासही कमी करीत नाहीत.
((श्री. नांदगावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत.)

(शब्दांकनः नरेंद्र राठोड)