प्रांतावर प्रेम हवे पण वाद नकोः गोपीनाथ मुंडे
आपल्या प्रांतावर आपले प्रेम हवेच. पण या प्रेमापोटी उगाचच भरकटत जाऊन वाद निर्माण व्हावेत हे मात्र योग्य नाही. आपण ज्या ठिकाणी रहातो, तो प्रांत आपला. आणि त्यावर आपले प्रेम हवेच. परंतु, प्रांतिक वाद मात्र नकोत. मी या प्रांताचा. तो त्या प्रांताचा. अशा भावनेने थोड्याफार प्रमाणात का होईना देशाच्या एकीवर परिणाम होतो. अन, आज जे प्रांतिक वाद होताहेत त्यात प्रेम थोडे आणि राजकारणच अधिक दिसते. राजकारणासाठी प्रांतिकतेला खतपाणी घालून नवीन वाद निर्माण करणे ही भविष्यातील सर्वांत चिंतेची बाब ठरणार आहे. येथील प्रत्येक सामान्य माणसानेच आता सावध झाले पाहिजे. त्याने आपल्या प्रांतावर प्रेम जरूर करावे. पण त्यासाठी वाद निर्माण करून आपण आपल्याच देशाची एकी भंग करतोय हेही लक्षात ठेवावे. (
श्री. मुंडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.) (
शब्दांकनः नरेंद्र राठोड)