Last Modified: वेलिंग्टन , शनिवार, 4 सप्टेंबर 2010 (11:15 IST)
न्यूझीलंडमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का
दक्षिण न्यूझीलंडमध्ये असलेल्या ख्राईस्टचर्च शहरापासून पश्चिमेकडे 30 किमी अंतरावर शुक्रवारी मध्यरात्री जोरदार भूकंपाचा धक्का बसला.
या भागातील जुन्या इमारतींच्या भिंती कोसळल्या असून, रस्त्यांनाही तडे गेले आहेत. यामुळे अनेक भागात वाहतुक कोंडी झाली होती. भूकंपाचा धक्का बसताच शहरातील रहिवाशांनी रस्त्यावर धाव घेतली.