बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 14 जुलै 2021 (10:30 IST)

पाकिस्तानमध्ये 15 जवानांचा मृत्यू

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात कुर्रम मध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ने पाकिस्तान सैन्यावर हल्ला केला.या हल्ल्यात पाकिस्तान सैन्याच्या केप्टनसह 12 ते 15 जवानांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक सैनिक गंभीररित्या जखमी झाले आहेत.एवढेच नव्हे तर पाकिस्तान तालिबानच्या दहशतवाद्यांनी सैन्याच्या  63 जवानांचं अपहरण केलं आहे.
 
पाकिस्तान विरोधात दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान ने मोहिमेत पाकिस्तानच्या सैन्याचे मोठे नुकसान केले.या मोहिमेच्या दरम्यान अनेक सैनिक मारले गेले.या मध्ये पाकिस्तानच्या केप्टन चे समावेश देखील आहे.
 
काही दिवसांपूर्वी तालिबानने पाकिस्तानला सांगितले होते की ''तालिबान आणि अफगाणिस्तान मध्ये चर्चेतून सामंजस्यात्मक करार करण्यासाठी आणि मदतीचा हात देण्यासाठी पाकिस्तानचे सवग आहे परंतु त्यांनी आम्हाला काही सूचना किंवा निर्देश देऊ नये.तसेच आपले विचार देखील आमच्यावर लादू नयेत.