बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (11:38 IST)

ऑपरेशन एलिस वेलकम अंतर्गत अफगाणिस्तानातून सुमारे 60 हजार लोक अमेरिकेत पोहोचले

वॉशिंग्टन. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने (डीएचएस) सांगितले की,अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याच्या ऑपरेशनचा भाग म्हणून 17 ऑगस्टपासून सुमारे 60,000 लोक देशात आले आहेत.ही मोहीम औपचारिकरित्या 'ऑपरेशन एलिस वेलकम' म्हणून ओळखली जाते.विभागाने बुधवारी जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीमध्ये म्हटले आहे की येथे येणारे 17 टक्के लोक अमेरिकन नागरिक आणि कायमचे रहिवासी आहेत,जे अफगाणिस्तानमध्ये होते. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर हे लोकं तिथे अडकले होते.
 
त्यांनी म्हटले आहे की उर्वरित 83 टक्के लोकांमध्ये विशेष इमिग्रेशन व्हिसा असलेले लोक आहेत ज्यांनी अमेरिका किंवा नाटोसाठी कोणत्या न कोणत्या स्वरूपात काम केले आहे. महिला आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांसारख्या तालिबान्यांकडून धोक्यात आलेले असुरक्षित अफगाण नागरिकांचेही विविध प्रकार आहेत. डीएचएस मंत्री अलेजांद्रो मेयरकस म्हणाले की, खूप कमी लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती, परंतु किती जण आहेत हे सांगण्यास नकार दिला.