‘पेंग्विन रॅनडस हाऊस’ला ओबामा व मिशेल यांच्या बायोग्राफी प्रकाशनाचे हक्क
न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध प्रकाशन कंपनी ‘पेंग्विन रॅनडस हाऊस’ने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा व फर्स्टलेडी मिशेल यांच्या बायोग्राफी प्रकाशित करण्याचे हक्क मिळविले आहेत यासाठी ओबामा पतीपत्नीला ६० दशलक्ष डॉलर्स (४ अब्ज रूपये) दिले जाणार आहेत. या कंपनीला जागतिक प्रकाशनाचा हक्क दिला गेला असून या कराराच्या अटींचा खुलासा झालेला नाही. वॉशिंग्टनमधील वकील रॉबर्ट बॅरनेट यांची या करारात मुख्य भूमिका होती.
रॉबर्ट बॅरनेट यांनी यापूर्वी जॉर्ज बुश, बिल किलंटन यांच्या आत्मचरित्र प्रकाशनासाठी वकील म्हणून प्रतिनिधित्व केलेले आहे. पेंग्विनसोबतच्या करारानुसार फर्स्ट बुक या चॅरिटी संस्थेला ओबामा परिवाराच्या नावाने १० लाख पुस्तके दान म्हणून दिली जाणार आहेत. क्लिंटन यांच्या माय लाईफ आफ्टर ही लेफ्ट ऑफिस या पुस्तकासाठी प्रकाशन संस्थेने त्यांना १ अब्ज रूपये दिले होते तर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांना त्यांच्या पुस्तकासाठी ६६ कोटी रूपये दिले गेले होते.