गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पुरुषाने दिला मुलीला जन्म

ब्रिटनमध्ये एका 21 वर्षांच्या मुलाने मुलीला जन्म दिला आहे. या विषयी जगभरात जोरदार चर्चा होत आहे. हेडन क्रॉस असे या तरुणाचे नाव असून काही ‍महिन्यांपूर्वी तो प्रेग्नंट असल्याची घोषणा केल्यामुळे चर्चेत आला होता. लिंगबदल करायचा होता, त्याची ही प्रक्रिया चालूही होती. मात्र काही कारणाने ती मध्यातच थांबवण्यात आल्याने त्याने स्पर्म डोनेशन घेऊन प्रेग्नंट व्हायचे ठरवले. 
 
त्याने मुलीचे नाव ट्रिनिटी असे ठेवले. तिच्या जन्मानंतर आता हेडन स्तन व अंडाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करवणार आहे. 
मागील तीन वर्षांपासून तो पुरुष म्हणून राहत असून तो हार्मोनबदलाशी निगडीत उपचार घेत आहे. स्त्रीलिंगी असलेल्या हेडनला लिंगबदल करुन पुरुष व्हायचे असल्याने तो हे उपचार घेत होता परंतू ही उपचार प्रक्रिया निधीअभावी पूर्ण होऊ शकली नाही. नंतर फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला स्पर्म डोनर मिळाला असल्याचे त्याने सांगितले. स्पर्म डोनरमुळे आपण यशस्वीपणे गर्भ वाढवू शकलो आणि मुलीला जन्म देऊ शकलो असे तो म्हणाला. स्वत:च मूलं असल्यामुळे तो खूप खूश असल्याचे त्याने सांगितले.