तो सहा दिवस पत्नीच्या शवसोबत झोपला
ब्रिटनच्या डर्बीशायर येथे राहणार्या रसल डेव्हिसन आपल्या बायकोच्या मृत्यूनंतर 6 दिवसापर्यंत आपल्या पत्नीच्या शवसोबत तिच्याच खोलीत झोपला. सर्वाइकल कँसरला 10 वर्षांपर्यंत झुंज देणार्या 50 वर्षीय वेंडी डेव्हिसन शेवटी जीवनाला हरली होती.
वेंडीची मृत्यू झाल्यावर तिच्या पतीची तिला शवगृहात ठेवण्याची मुलीच इच्छा नव्हती. त्याला स्वत: तिची काळजी घेयची होती. तिला आराम मिळावा म्हणून तिच्या बेडरूममध्येच तिला राहू दिलं आणि तो स्वत:ही तिथेच झोपायचा.
10 वर्षापूर्वी कर्करोग झाल्याचं कळल्यावर रसलने नैसर्गिकरीत्या तिच्यावर उपचार केला. तिला डॉक्टरांची सुर्पुद न करता केमोथेरपी आणि रेडिओथेरेपी ला नकार देत नैसर्गिकरीत्या तिचं जीवनकाळ वाढवलं. तिच्या आयुष्यातील शेवटले सहा महिने शिल्लक राहिले तेव्हा हे जोडपं युरोप भ्रमणासाठी निघून गेला होता. तो तिच्या जीवनातील सर्वात सुखद क्षण होता परंतू वेदना वाढल्यावर त्यांना परत यावे लागले.
रूग्णालयात भरती झाल्यावरही मृत्यू घरातच व्हावी अशी दोघांची इच्छा होती. वेंडीची मृत्यू माझ्या आणि डिलेनच्या खांद्यावर वेदनारहित शांतिपूर्ण झाली. आमचा निष्ठावंत कुत्राही आमच्यासोबतच बसला होता. त्यावेळी नातेवाईक आणि मित्रांचे जवळ असणे सुकून देणारे होते.
मृत्यूच्या पाच दिवसाच्या आत त्याची नोंद केली जाते. अंतिम संस्कार करण्यापूर्वी शव कायदेशीर घरात ठेवू शकतात.