बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:51 IST)

इराकचे पंतप्रधान अल-कादिमी ड्रोन हल्ल्यात जखमी

बगदाद. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांच्यावर रविवारी पहाटे ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान अल-कादिमी यांनी ट्विट केले की, "देशद्रोहाचे रॉकेट वीर सुरक्षा दलांच्या चिकाटीला आणि दृढनिश्चयाला डिगावु शकणार नाही." त्यांनी लिहिले, 'मी ठीक आहे आणि माझ्या लोकांमध्ये आहे. देवाचे आभार.'
ड्रोन हल्ल्यात इराकच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर लक्ष साधून कात्युषा रॉकेट डागण्यात आल्याचे अल अरेबियाने वृत्त दिले आहे. या हल्ल्यात अल-कादिमी आणि त्यांचे अनेक सुरक्षा अधिकारी जखमी झाले.
 
बगदादमधील ग्रीन झोनजवळही जोरदार गोळीबार झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अल-काधिमी यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेले ड्रोन ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रतिमा सौजन्य: अल कादिमी ट्विटर अकाउंट