ज्युलियन असांजे याला ब्रिटिश पोलिसांकडून अटक
विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याला ब्रिटिश पोलिसांनी गुरुवारी अटक केलीय. दूतावासानं पोलिसांना बोलावून घेतल्यानंतर इक्वाडोर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी असांजे याला ताब्यात घेतलं. असांजे यानं २०१२ पासून इक्वाडोर दूतावासाकडे शरण घेतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युलियन असांजे याला मेट्रोपॉलिटन पोलीस सर्व्हिसनं इक्वाडोर दूतावासमधून ११ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. इक्वाडोरनं असांजेला दिलेली शरण परत घेतल्यानंतर राजदूतांनी पोलिसांना दूतावासात बोलावून घेतलं. याच ठिकाणी असांजे याला अटक करण्यात आली.
२०१३ साली असांजे यांनी विकिलिक्सच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट केले होते. त्याच्या या गौप्यस्फोटांमुळं अमेरिकाही अनेकदा अडचणीत आली होती. त्यानंतर असांजे याच्यावर स्वीडनमधल्या दोन महिलांनी बलात्काराचा आरोप केला होता. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी स्वीडनची सुरक्षा यंत्रणा असांजे याची चौकशी करणार आहे.