सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (11:40 IST)

मालदीवचे पर्यावरण राज्यमंत्री अली सोलिह यांच्यावर मालेमध्ये हल्ला,हल्लेखोराला अटक

crime
मालदीवचे पर्यावरण राज्यमंत्री अली सोलिह यांच्यावर एका धर्मांधाने चाकूने हल्ला केला. राजधानी माले येथे मंत्री अली सोलिह त्यांच्या स्कूटरवरून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मंत्र्यावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर त्यांच्या स्कूटरसमोर येऊन उभा राहिला. या घटनेत मंत्री अली सोलिह यांच्या हाताला आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. कसातरी पळून त्याने आपला जीव वाचवला. मंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 
 
मात्र, घटनेनंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली.