शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (12:29 IST)

बॉसची हत्या करण्यासाठी कर्मचाऱ्याने कोरोना रुग्णाकडून 5 हजारात खरेदी केली लाळ

तुर्की-  दक्षिण-पूर्व तुर्कीमधील अदाना येथे राहणाऱ्या इब्राहिम उर्वंडी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्याच्या एका कर्मचाऱ्याने त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्याने आपल्या बॉसला मारण्यासाठी कोरोना रुग्णाकडून लाळ खरेदी केल्याचा विक्षिप्त प्रकार समोर आला आहे. 
 
काय आहे प्रकरण 
अदाना सिटीच्या एका कार डीलर उर्वंडी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अलीकडेच त्यांनी एक 215000 तुर्की लीरा म्हणजेच 22 लाख रुपयांना विकली आणि कर्मचार्‍याला हे पैसे ऑफिसमध्ये नेण्यास सांगितले. त्याच्या लॉकरची चावी दिल्याचे सांगितले. पण तो रक्कम घेऊन फरार झाला. त्यानंतर बऱ्याचदा फोन करुन त्याने उत्तर दिलं नाही आणि मग पैसे चोरी केल्याचे सांगितले. 
 
उर्वंडी यांनी दावा केला की या कर्मचाऱ्याने त्यांना मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्याने कोविड रुग्णाचं लाळ असलेलं पेय दिलं मात्र मी ते प्यायलं नाही. या कर्मचाऱ्याने 5000 रुपयांत कोविड रुग्णाकडून लाळ विकत घेऊन माझ्या पेयात मिसळली होती, असे सांगितले. याबाबत ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याने माहिती दिली. 
 
ऐवढेच नव्हे तर कर्मचाऱ्याने बॉसला धमकी मेसेजही पाठवले आहेत. एका मेसेजमध्ये लिहिलं आहे की, मी तुम्हाला कोरोनाने मारू शकलो नाही, मात्र पुढच्या वेळी गोळ्या घालीन. आता पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहे. मात्र सर्वीकडे वि‍क्षिप्त प्रकाराची चर्चा सुरु आहे.