शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , मंगळवार, 22 जानेवारी 2019 (11:26 IST)

अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा : इव्हीए हॅकिंगबाबत माहीत असल्याने मुंडेंची हत्या

'इव्हीएम हॅक करता येते. भारतात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम हॅकिंग झाले होते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीतही इव्हीएममध्ये फेरफार केले गेले', असा दावा करतानाच इव्हीएम हॅकिंगबाबत माहिती असल्यानेच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकन सायबर एक्स्पर्टने लंडनमध्ये सुरू असलेल्या 'इव्हीएम हॅकेथॉन'मध्ये केला. विशेष म्हणजे इव्हीएम कशाप्रकारे हॅक केले जाऊ शकते, याचे प्रात्यक्षिकही त्याने या हॅकेथॉनमध्ये दाखवले.
 
2014 च्या लोकसभा निवडणुका या इव्हीएममध्ये घोळ करुन त्यांचे निकाल नियोजित करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकाही मॅनेज करण्यात आल्या होत्या असाही आरोप शुजा या सायबर एक्स्पर्टने केला आहे. लंडनमध्ये आयोजित केलेल पत्रकार परिषदेतून व्हिडिओ लिंकद्वारे शुजा या सायबर एक्स्पर्टने भाजपवर आणि इतर पक्षांवर इव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे.
 
लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते कपिल सिब्बलही हजर होते. इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनने या परिषदेचे आयोजन केले होते. 2014 मध्ये इव्हीएम घोटाळा करण्यात आल्याचा आरोप बर्‍याचदा करण्यात आला आहे. काँग्रेस, आप यांसह सगळ्याच पक्षांनी हा दावा केला होता. आता हाच आरोप कुठेतरी वास्तवात समोर येताना दिसतो आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही कालावधी उरला असतानाच हे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा 2009 ते 2014 या कालावधीत शुजा कर्मचारी होता. त्याने सांगितले की या पत्रकार परिषदेला निवडणूक आयोग तसेच राजकीय पक्षांनाही बोलावण्यात आले होते. शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे. याआधीही शुजा व त्याच्या सहकार्‍यांवर हल्ले झाले होते असेही त्याने म्हटले आहे.