बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 14 जानेवारी 2019 (11:01 IST)

बराक ओबामा, हिलरीनंतर आता श्वेता शालिनी यांना क्वोराचे निमंत्रण

ज्ञानाची देवाणघेवाण करणार्‍या क्वोरा संस्थेच्यावतीने येत्या 21 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या  चर्चासत्रासाठी महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्त्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांना निमंत्रण दिले आहे.
 
अमेरिकेतील बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांच्यानंतर भारतातील शालिनी यांना चर्चासत्रात सहभागाची संधी मिळाली आहे. असा सन्मान मिळणार्‍या त्या पहिल्या भारतीय असल्याचा दावा करण्यात आला आहे. याअगोदर या व्यासपीठावरुन अमेरिकेच बराक ओबामांनी त्या वेळेसच्या राजकीय घटनांवर म्हणजेच इराण अणुकरार तसेच ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशीपवर उत्तरे दिली होती.
 
क्वोरा हे एक ज्ञानाची देवाण घेवाण करण्याचे मोठे माध्यम आहे. लोकांना पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून या माध्यमाद्वारे दिली जातात. दर महिन्याला 7 कोटी भारतीय क्वोराच्या ज्ञानात भर घालतात. क्वोरा अतिमहत्त्वाच चर्चासत्रासाठी राजकीय नेत्यांना, शास्त्रज्ञांना, वेगवेगळ्या कंपन्यांना बोलावत असते.
 
ज्ञानाची देवाण घेवाण करण्याचे मोठे माध्यम असल्या कारणाने ते वेगवेगळ्या संकेतस्थळावरील रहदारी मोजणार्‍या अलेक्सा रँकिंगमध्ये 19व्या स्थानी आहे. वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करणार्‍या अ‍ॅमेझॉन कंपनीला क्वोराने मागे  टाकले आहे. काही महिन्यांपूर्वी क्वोरा हे हिंदी भाषेमध्ये उपलब्ध झाले आहे. त्यामुळे श्वेता शालिनी या भारतीय युवकांना हिंदीत योग्य मार्गदर्शन करतील. याचा भारतीय युवकांना नक्कीच फायदा होईल.
 
क्वोराने भाजपच्या नेत्या, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन कंपन्यांच्या यशस्वी उद्योजिका शालिनी यांच्या पारड्यात हा मान टाकला आहे. त्यांना राजकीय, माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामीण जीवनासारख्या वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव आहे. मोदी सरकारचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊन लोकसभेचा रणसंग्राम तोंडावर असताना 21 तारखेला शालिनी यांना कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्या कोणत्या प्रकारचे प्रश्न निवडतात आणि त्यांना त्या कशी उत्तरे देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या संधीमुळे क्वोरावरील शालिनी यांचे वर्चस्व वाढणार आहे. भाजपच्या महिला सबलीकरणाचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. शालिनी यांना ही संधी मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावहोत आहे.