गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (19:22 IST)

उत्तर कोरियाने जपानवर क्षेपणास्त्र डागले,अनेक ठिकाणी रेल्वे सेवा बंद,जे-अॅलर्ट' जारी

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची हुकूमशाही पुन्हा एकदा समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळेसही उत्तर कोरियाने अज्ञात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे, परंतु यावेळी हे क्षेपणास्त्र जपानच्या वरून गेले, त्यामुळे तेथील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. बाहेर फिरणारे लोक त्यांच्या घरात घुसले. एवढेच नाही तर जपान सरकारनेही आश्रयस्थळे रिकामी करण्याचा इशारा देत सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले. एवढेच नाही तर लपण्यासाठी अनेक ठिकाणी निवारागृहेही बांधण्यात आली आहेत.
 
अॅलर्ट जपानी अधिकाऱ्यांनी ईशान्य भागातील रहिवाशांना जवळपासच्या इमारती रिकामी करण्यासाठी 'जे-अॅलर्ट' जारी केला आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच असा 'अलर्ट' जारी करण्यात आला आहे. जपानमधील होक्काइडो आणि आओमोरी भागातील रेल्वे सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती. मात्र, आता ते पूर्ववत करण्यात आले आहे.
 
जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, उत्तर कोरियाने डागलेले किमान एक क्षेपणास्त्र जपानमधून जात असताना पॅसिफिक महासागरात पडण्याची शक्यता आहे.
 
Edited By- Priya Dixit