रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कॅनडा , सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (12:14 IST)

12 हजार लोकांना खारीने लोटले अंधारात

सार्निया ऑन्टारिओ येथे एक खार वीज निर्मिती केंद्रात भरकटली व सुमारे 12 हजार रहिवाशांना तिने अंधारात लोटले होते. काही तासांत वीज पुरवठा सुरू झाला परंतु खार काही वाचली नाही. ही कार जलविद्युत केंद्राच्या एका भागात भरकटी व तेथील लोकांचा वीज पुरवठा खंडीत झाला. तो सुरू झाला तो दुपारी, असे ब्लूवॉटर पॉवर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅकमायकेल - डेनीस यांनी सांगितले. प्राण्यांमुळे अशा घटना येथे नव्या नसल्या तरी या ताज्या घटनेमुळे फार मोठ्या संख्येतील लोकांची गैरसोय झाली. एखाद्या वीज केंद्राचा अर्था भाग बंद पाडरे हे प्राण्याकडून क्वचित होते. साधारण: असले प्राणी फीडर बंद पाडतात व एक हजार ग्राहकांना फटका बसतो.