मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (21:35 IST)

भाडेकरू ने भाडे दिले नाही, मालकाने घराला पेटवले

fire
अमेरिकेतील न्यूयार्क शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका घरमालकाने भाडेकरूने पैसे दिले नाही म्हणून त्याच्या राहत्या घराला आग लावली. घर मालकाने आग लावली तेव्हा भाडेकरूंच्या कुटुंबातील 8 सदस्य झोपले होते. भाडेकरूंच्या कुटुंबातील सदस्यांचा जीवघेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. पोलिसांनी आरोपी रफिकुल इस्लाम नावाच्या या  घर मालकाला अटक केली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, 66 वर्षीय इस्लाम या व्यक्तीने गेल्या महिन्यात ब्रुकलिन या इमारतीला आग लावली. या इमारतीत सहा मुलांना घेऊन एक जोडपं भाड्यानं राहत होत. 
या कुटुंबप्रमुखाने घरभाडे दिले नाही.आणि तो घर देखील रिकामे करत नव्हता. म्हणून घरमालक इस्लामला राग आला आणि त्याने चिडून ब्रुकलिनच्या आतल्या पायऱ्यांना आग लावली. या वेळी त्या घरात एकूण 8 जण होती. सुदैवाने ते बचावली. या प्रकरणी घरमालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 
 



Edited by - Priya Dixit