रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (13:32 IST)

२०२४ ला मी पुन्हा येईन: डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले. ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन असं म्हटलं.
 
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जो बायडन यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ट्रम्प एका हॉलीडे रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या वेळी बोलताना ट्रम्प यांनी आता थेट २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे संकेत दिले.
 
आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना ते म्हणाले की ही चार वर्षे खूपच छान होती, आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला आणखीन चार वर्षे सेवेसाठी मिळावेत. म्हणूनच मी तुम्हाला भेटीसाठी चार वर्षांनंतर पुन्हा येईन, असं म्हणाले. 
 
या पार्टीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य उपस्थित होते.