गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 15 डिसेंबर 2018 (09:54 IST)

आजीने केला विक्रम, १०२ वर्षी केले स्कायडायव्हींग

ऑस्ट्रेलियाच्या एडिलेडमध्ये राहणाऱ्या इरेना ओशिया या 102 वर्षांच्या आजीने तब्बल 14 हजार फूट उंचीवरून विमानातून उडी घेत स्कायडायव्हींग केलं आहे. आजीच्या या विक्रमाने एक रेकॉर्ड रचला आहे. उडी मारल्यानंतर इरेना यांची गती 220 किमी/प्रती तास अशी होती. असं असतानाही त्यांनी यशस्वीरित्या लँडिंग केलं आहे. 30 मे 1916 मध्ये जन्मलेल्या इरेना यांनी या अगोदर दोन वेळा स्कायडायव्हींग केलं आहे.  या अगोदर त्यांनी 100 वर्षांच्या झाल्यावर असा कारनामा केला होता. 
 
इरेना यांनी  स्कायडायव्हींग हे कोणत्या रेकॉर्डसाठी केलेलं नाही तर याच्या माध्यमातून त्या मोटर न्यूरॉन या आजारावर संशोधन करण्यासाठी पैसे जमा करत आहे. आजींच्या 67 वर्षांच्या मुलगी याच आजाराने निधन झाले. 10 वर्षांपूर्वी आपल्या मुलीला गमावलेल्या या आजीने या आजारावर संशोधन करण्यासाठी पैसे जमा करण्याचा निश्चय केला आहे.