मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2019
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2019 (10:15 IST)

आयपीएलमध्ये सट्टेबाजी, माजी प्रशिक्षकाला अटक

आयपीएलमध्ये सट्टेबाजीप्रकरणी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. प्रशिक्षक तुषार आरोठे यांना बडोदा पोलिसांनी अटक केली आहे. आरोठे यांच्यासोबत पोलिसांनी १८ जणांविरोधात अटकेची कारवाई केली आहे. बडोदा पोलिसांनी यांच्याकडून मोबाईल आणि गाड्या जप्त केल्या आहेत. आयपीएलचा राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना सुरु आहे. या सामान्यावर अटक केलेल्यांनी सट्टा लावला होता. 
 
तुषार आरोठे हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आहेत. जूलै २०१८ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. काही वैयक्तिक कारणामुळे मी स्वखुशीने पद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आरोठे आणि खेळाडूंमध्ये मतभेद असल्यामुळे त्यांना पद सोडावे लागले होते असे समोर आले होते.