सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Updated : सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (14:36 IST)

DC vs KKR PL 2022: दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा 4 गडी राखून पराभव केला

ipl 2022
DC vs KKR लाइव्ह स्कोअर IPL 2022: IPL 2022 चा 41 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सवर ४ विकेट्सने मात करत या मोसमातील चौथा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 146 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 19 षटकांत 6 बाद 150 धावा करून सामना जिंकला. 
 
केकेआरकडून नितीश राणाने 57 धावा केल्या. केकेआरसाठी कुलदीप यादवने तीन षटकांत14 धावांत चार बळी घेतले, तर मुस्तफिझूर रहमानने चार षटकांत 18 धावांत तीन बळी घेतले. कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खूपच खराब झाली. पॉवरप्लेमध्येच दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. फिंच 3, व्यंकटेश 6, बाबा इंद्रजित 6 आणि नरेन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार श्रेयस अय्यर 42 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रसेल खाते न उघडताच बाद झाला. 
 
दिल्ली कॅपिटल्स 8 सामन्यांत चार विजय आणि 8 गुणांसह 10 संघांच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे, तर कोलकाता 9 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. कोलकाताच्या संघाला मागील पाच सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.