'आयपीएलमधील कामगिरी लक्षात घ्यावी'
विरेंद्र सेहवागने राष्ट्रीय संघात निवडीसाठी आयपीएल स्पर्धेतील कामगिरी लक्षात घेण्यात यावी, असे मत व्यक्त केले आहे. या स्पर्धेमुळे बहुतेकांना कौशल्य दाखवण्याची संधी दिल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. जगभरातून ही स्पर्धा बघितली जात आहे. आपणास इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज सारख्या देशातून संघाच्या उत्तम कामगिरीसाठी एसएमएस येत आहेत. यामुळे भारतीय क्रिकेट संघाची निवड करताना निवडकर्त्यांनी आयपीएलमधील कामगिरी लक्षात घ्यावी, असे मत त्याने व्यक्त केले आहे.