मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

आयपीएल फिक्सिंग कांड: श्रीनिवासन यांचे जावई फरार

FILE
चेन्नई. चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ गुरूनाथ मयप्पन फरार असून ते पोलिसांसमोर येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी शंका कायम राहील. दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना हजर होण्याचे फर्मान सोडले आहे.

आज सकाळी विचारपूस करण्यासाठी चेन्नईत आलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी मेयप्पन यांना त्यांच्या बोट क्लब स्थित निवासस्थानावर समन्सही बजावला. फिक्सिंग कांडात अटक झालेले विंदू दारा सिंह मेयप्पन यांच्या संपर्कात होते.

मयप्पन कोठे आहे याबाबत रहस्य कायम असून काही वृत्तांनुसार ते कोलकात्यास रवाना झाले तर काही वृत्तानुसार चेन्नई व मुंबई दरम्यान मंगळवारी दिल्लीत झालेल्या पहिल्या क्वालीफायर सामन्यानंतर तेथेच थांबले आहेत. (भाषा)