सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 30 मे 2008 (14:52 IST)

चेन्नईसमोर पंजाबचे कडवे आव्हान

वानखेडे मैदानावर उद्याच्या उपांत्य सामन्यात चेन्नई सुपर किंग व पंजाब किंग्स यांच्यात लढत रंगणार आहे. शॉन मार्श जबरदस्त फॉर्ममध्ये असण्यासोबत इतर खेळाडूंचाही समन्वय उत्तम असल्याने चेन्नईच्या तुलनेत पंजाबचे पारडे जड वाटत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या डावखूर्‍या फलंदाजाने उत्तम फलंदाजी शैली व कलात्मक क्रिकेटचे फटक्यांची आतषबाजी करून सर्वांना आवाक् केले आहे. स्पर्धेत दहा सामन्यात त्याने सर्वाधिक 593 धावा तडकवल्याने चेन्नईच्या विजयरथात त्याचा प्रमुख अडथळा राहणार आहे.

यानंतर कुमार संगकारा, महेला जयवर्धने व युवराज सिंग यांसारखे भक्कम फलंदाजांची फळी त्यांच्याकडे असल्याने पंजाबचा संघ कडवा प्रतिस्पर्धी ठरणार यात शंका नाही.