मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी आमरे
मुंबईला 38 वे रणजी करंडक जिंकून देणारे प्रशिक्षक प्रवीण आमरे यांना इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचाइजी मुंबई इंडियन्सचा नवा प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. फ्रेंचाइजीच्या प्रवक्त्याने सांगितले, की आमरे भारताचे माजी सलामी फलंदाज लालचंद राजपूत यांची जागा घेतील. आणि संघाचे मुख्य मेंटर आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक शॉन पॉलाक यांची मदत करतील.