शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (14:49 IST)

पासवर्ड विसरलाय?

कॉम्प्युटर, लॅपटॉपचा पासवर्ड विसरल्यावर चांगलीच पंचाईत होते. नवा पासवर्ड सेट करताना जुन्या पासवर्डची विचारणा केली जाते. जुना पासवर्ड लक्षातच नसेल तर करायचं तरी काय? नवा पासवर्ड वेगळ्या पद्धतीने सेट करता येईल. आधीचा पासवर्ड द्यावा लागणार नाही. अशावेळी नवा पासवर्ड कसा सेट करायचा हे जाणून घेऊ.
 
सर्वात आधी तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट या ऑप्शनची निवड करावी लागेल. विंडोजमधल्या स्टार्ट मेनू किंवा रन कमांडद्वारे कमांड प्रॉम्प्टची निवड करता येईल. कमांड प्रॉम्प्ट ओपन झाल्यावरनेट युजर हे शब्द टाईप करून 'एंटर' की दाबा. यानंतर कॉम्प्युटरच्या सर्व युजर्सची नावं स्क्रीनवर दिसू लागतील.
यात तुमचंही नाव असेल.
 
समजा, तुमचं नाव एक्सवायझेड आहे. आता नेट युजर एक्सवायझेड 123123123 टाईप करून पुन्हा एंटर की दाबा. तुमचा पासवर्ड बदललेला असेल. 123123123 हा या युजरचा नवा पासवर्ड आहे. तुम्ही आपल्या आवडीचा पासवर्ड नोंदवू शकता. ही कृती करताना जुना पासवर्ड विचारला जात नाही. त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही.
 
पंकजा देव