शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (19:17 IST)

बनावट अॅप्स किंवा सॉफ्टवेअर कसे ओळखावे जाणून घ्या

तंत्रज्ञानाच्या या युगात कोट्यवधी स्मार्टफोन वापरकर्ते मोबाईल तंत्रज्ञानाच्या सुविधा आणि मनोरंजनाचा आनंद घेत आहेत. विविध अॅप्स, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाची सतत वाढणारी निवड आधुनिक जगात नेव्हिगेट करण्यासाठी आमचे फोन किंवा उपकरणे एक महत्त्वपूर्ण साधन बनवते. परंतु स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या जसजशी वाढत आहे, तसतसे मोबाइल फोनला लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे प्रमाणही वाढत आहे, विशेषत: बनावट अॅप्स आणि बनावट सॉफ्टवेअर तयार करून गुन्हे करणे वाढत आहे. डेटा चोरण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून बनावट अॅप्स किंवा बनावट सॉफ्टवेअर तयार केले जातात. बनावट अॅप्स आणि सॉफ्टवेअरचे स्वरूप आणि कार्य अगदी मूळ अॅप्स आणि सॉफ्टवेअरप्रमाणेच बनवलेले असतात, ज्यामध्ये केवळ नाममात्र फरक असतो, जो सामान्य व्यक्ती ओळखू शकत नाही. जर कोणी हे बनावट अॅप्स किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करत असेल तर ते सॉफ्टवेअर डेटामध्ये प्रवेश करण्याची परवानगी मागतात. ज्याला बहुतेक लोक परवानगी देतात आणि सायबर गुन्हेगार संपूर्ण डेटा चोरून आपली  फसवणूक करतात.
 
बनावट अॅप्स किंवा सॉफ्टवेअर कसे ओळखावे 
 
1. एखादे अॅप किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यापूर्वी त्याच्या डेव्हलपरचे     संशोधन करण्यासाठी अतिरिक्त वेळ घ्या. अशा प्रकारची माहिती गुगल ब्राउझरवर मिळू शकते. जे आपल्याला ते विश्वसनीय आहे की नाही हे कळू देते. 
2. बनावट अॅप किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर बनावट अॅपला त्याच्या मूळ अॅपसारखे बनवतात. त्यामुळे कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी प्रत्येक अक्षर काळजीपूर्वक वाचा आणि चुकीचे शब्दलेखन तपासून पहा. 
3. असे अॅप किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यापूर्वी त्याची रिलीज डेट तपासा. जर एखादे नवीन अॅप कमी कालावधीत मोठ्या संख्येने लोकांनी डाउनलोड केले असेल तर ते बनावट अॅपचे लक्षण असू शकते.
4. बनावट अॅप्स तुमच्या डेटावर अधिक परवानग्या मागतात ज्याची खरोखर गरज नाही. कोणतीही परवानगी देण्यापूर्वी त्याची गरज आहे की नाही ते तपासा. 
5. फक्त आपल्या  डिव्हाइसच्या सेटिंग्जमधून डिव्हाइसवरील सॉफ्टवेअर अपडेट करा. संशयास्पद वेबसाइट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा सिस्टीम अपडेट करण्याचे वचन देणाऱ्या अॅप्सवरून आपले  डिव्हाइस कधीही अपडेट करू नका. 
6. आपले डिव्‍हाइस नेहमी अपडेट करून ठेवा आणि व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्‍यासाठी उच्च दर्जाचे अँटी व्हायरस इन्‍स्‍टॉल करा. 
7. अज्ञात सॉफ्टवेअर किंवा अॅप्स डाउनलोड करू नका. ऑनलाइन किंवा ईमेलद्वारे ऑफर केलेल्या विनामूल्य सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन बद्दल विशेषतः सावधगिरी बाळगा. 
8. सॉफ्टवेअर लिंक्स, अॅप लिंक्स किंवा ईमेल, पॉपअप्स, इन्स्टंट मेसेजेस/टेक्स्ट मधील जाहिरातींवर किंवा फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर क्लिक करू नका.
9. आपल्या डिव्हाइसचे अँटीव्हायरस किंवा इतर संरक्षणात्मक सॉफ्टवेअर कधीही निष्क्रिय करू नका. त्यांना वारंवार आणि स्वयंचलितपणे अपडेट करण्यासाठी सेट करून ठेवा. 
10. फाईल्स, अॅप्स, सॉफ्टवेअर आणि प्लगइन्स फक्त आणि फक्त विश्वसनीय स्त्रोतांकडून डाउनलोड करा. या सर्व खबरदारीचा अवलंब करून आणि बनावट सॉफ्टवेअर आणि अॅप्स  ओळखून, आपण  होणारे संभाव्य सायबर गुन्हे बर्‍याच अंशी टाळू शकतो.