शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: रविवार, 7 मार्च 2021 (10:00 IST)

मोबाईल हँग होण्यापासून कसे वाचवाल जाणून घ्या

आपण स्मार्टफोन वापरता तर आपल्या समोर फोन हँग होण्याच्या समस्या येतच असणार .फोन मध्ये एकच प्रोसेस बऱ्याच काळ सुरू असते. या मुळे बराच वेळ वाया जातो.या मागील अनेक करणे असू शकतात, जसे की मोबाईलमध्ये रॅम कमी होणं, इंटर्नल स्टोरेज कमी असणे,फोन मध्ये व्हायरस येणं इत्यादी .आपला देखील फोन हँग होत असल्यास या टिप्स अवलंबवा जेणे करून आपला फोन हँग होणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
मोबाईल हँग होण्याचे कारणे जाणून घेऊ या- 
 
1 बऱ्याच वेळा मोबाईल फोन मध्ये एकाच वेळी अधिक अ‍ॅप्स चालविण्याने देखील मोबाईल हँग होतो. म्हणजे मल्टिटास्किंग केल्याने.
 
2 मोबाईलमध्ये रॅम कमी असल्यास हा खूप हळू काम करतो, या मुळे अ‍ॅप्स उशिरा उघडतात आणि फोन हँग होण्यास सुरुवात होते. 
 
3 मोबाईल मध्ये अंतर्गत स्टोरेज म्हणजे इंटर्नल स्टोरेज अधिक भरल्यामुळे मोबाईल हँग होतो.  फोनची अंतर्गत स्टोरेज ऑडिओ,व्हिडीओ, फोटो संग्रहित करून ठेवतो ज्यामुळे मोबाईल हँग होतो. 
 
4  मोबाईल मधील कॅश फाईल्स डिलीट न केल्याने मोबाईल स्लो होतो नंतर हँग होतो.
 
5 मोबाईल मध्ये अधिक प्रमाणात अ‍ॅप्स इंस्टाल केल्याने देखील मोबाईल हँग होतो. 
 
6 मोठे अ‍ॅप्स कमी रॅम च्या फोन मध्ये वापरल्याने फोन हँग होतो. 
 
7 मोबाईल मध्ये व्हायरस आल्याने देखील मोबाईल हँग होतो. 
 
* मोबाईल हँग समस्या दुरुस्त करण्यासाठी चे उपाय- 
  
1 नको असलेला डेटा डिलीट करा- 
आपल्या मोबाईल ला तपासून बघा आणि नको असलेला डेटा काढून टाका. असं केल्याने मोबाईल व्यवस्थित काम करतो. जेव्हा देखील आपण एखादा अ‍ॅप्स किंवा वेबसाइट उघडतो तर त्याची कॅश फाईल्स आणि कुकीज मोबाईलच्या इंटर्नल स्टोरेज मध्ये स्टोअर होते आणि मोबाईल हँग होऊ लागतो. हे डिलीट करण्यासाठी या टिप्स अवलंबवा.
1  setting > storage >cache  
 
2 अनावश्यक अ‍ॅप्स थांबवा- 
 
आपल्या मोबाईल मध्ये अनेक अ‍ॅप्स असे असतात जे आपण वापरत नाही आपण त्यांना आपल्या मोबाईल मधून काढून टाका. करणं हे अ‍ॅप्स बॅकग्राऊंड मध्ये सुरू असतात आणि रॅम चा वापर करतात, या मुळे मोबाईल हँग होतो. 
हे अ‍ॅप्स या पद्धतीने बंद करू शकता.   
 Settings >Application >select app >Force Stop  
 
3 इंटर्नल अ‍ॅप्स एसडी कार्ड मध्ये मूव्ह करणे- 
जेव्हा आपण एखादा अ‍ॅप्स इन्स्टॉल करता तर ते मोबाईलच्या अंर्तगत म्हणजे इंटर्नल स्टोरेज मध्ये सेव्ह होतो, या मुळे मोबाईलची इंटर्नल स्टोरेज हळू-हळू पूर्ण भरते आणि फोन हँग होऊ लागतो. या साठी  आपण हे सर्व अ‍ॅप्स एसडी कार्डात मूव्ह करू शकतो. या मुळे फोनची जागा रिकामी होईल या साठी आपण गुगल वरून कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप्स चा वापर करू शकता. 
 
4 मोठे अ‍ॅप्स डिलीट करा- 
मोबाईल फोन मध्ये कमी स्टोरेज आणि रॅम असल्यामुळे बरेच लोक हेवी मोबाईल अ‍ॅप्स किंवा गेम्स इंस्टाल करतात या कारणांमुळे देखील मोबाईल हँग होऊ लागतो. अशा परिस्थिती मध्ये मोबाईल मधून काही हेवी अ‍ॅप्स डिलीट करावे. 
 
5 कमी रॅम असलेल्या मोबाईल फोन मध्ये मल्टीटास्किंग करू नये, तसेच ब्राऊझरवर जास्त टॅब उघडू नये. या मुळे रॅम जास्ती लागते. आणि मोबाईल हँग होऊ लागतो. प्रोसेसर देखील देखील चांगला नसल्यामुळे मोबाईल हँग होऊ लागतो. म्हणून मोबाईल हाताळताना या गोष्टींची काळजी घ्यावी.