शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

मोबाइलमधून फोटो डिलिट झालेत?

बर्‍याचवेळा नकळतपणे आपल्या मोबाइलमधील महत्त्वाचे फोटो डिलिट होतात. अशावेळी आपल्याला फार टेंशन येते. पण आता टेंशन घेण्याची काहीच गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला अशा काही अ‍ॅप्सची नावे सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही डिलिट झालेले फोटो पुन्हा प्राप्त करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही अ‍ॅपविषयी 
 
DiskDigger Photo Recovery 
या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला डिलिट झालेले सर्व फोटो पुन्हा मिळवता येऊ शकतात. गुगल प्ले स्टोअरवर DiskDigger Photo Recovery  हे नाव शोधताच तुम्हाला हे अ‍ॅप मिळून जाईल.
 
Restore Image (Super Easy) 
हे अ‍ॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन मोफत डाऊनलोड करू शकता. याचे सर्व फीचर्स फ्री असून या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही डिलिट फोटो लगेच रिकव्हर करू शकता.
 
Dumpster : Undelee Restore ictures ad Videos  
हे एक जबरदस्त अ‍ॅप असून याच्या माध्यमातून तुम्ही फोटो आणि व्हिडिओ दोन्ही रिकव्हर करू शकता. या अ‍ॅपच्या माध्यमातून अगदी कमी वेळात रिकव्हरीचे काम पूर्ण होते.