बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (15:16 IST)

PUBG Mobile: भारतात बॅनची मागणी, कंपनीने दिले वचन

तरुणांना खूपच कमी काळात आपल्याकडे आकर्षित करणार्‍या ऑनलाइन मोबाइल गेम PUBG Mobile ने भारतात बॅन केल्या जाण्याची मागणीनंतर एक वक्तव्य जारी केलं आहे. कंपनीने वचन दिले आहे की भारतीय वापरकर्त्यांना लक्षात ठेवत कंपनी मुलांच्या पालक, शैक्षणिक आणि सरकारी संस्थांसोबत काम करेल. 
 
PUBG गेम भारतात खूप वेगाने पसरला आहे. कंपनीप्रमाणे या गेमचा व्यसन होत नाही तरी या गेमची खूप टीका मात्र होत आहे. आरोप आहे की या गेममुळे लोकांमध्ये हिंसक भावना वाढत आहे आणि मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. बहुतेक म्हणूनच PUBG Mobile वर बंदीची मागणी होत आहे. 
 
PUBG Mobile बनवणार्‍या कंपनीने आपल्या वक्तव्यात असे म्हटले की आमच्या वापरकर्त्यांद्वारा गेमसंबंधी समर्थन आणि आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी धन्यवाद. आम्ही आपल्या फॅन्सना सर्वोत्कृष्ट गेमिंग अनुभव देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. गेम्स जगातील जवाबदार सदस्य होणे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. या प्रकरणाची खात्री करण्यासाठी आम्ही सतत वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत आहोत आणि करत राहू. आम्ही पालक, शैक्षणिक आणि सरकारी संस्थांशी बोलत आहोत आणि पबजी मोबाइलबद्दल फीडबॅक घेत आहोत.