शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 6 मार्च 2018 (11:27 IST)

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भन्नाट गिफ्ट, 10 जीबी डाटा फ्री

reliance jio 10 gb data free
मोबाइल इंटरनेट इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणार्‍या रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. जिओ टीव्हीवर लाइव्ह स्ट्रिगिंसाठी जिओकडून यूजर्सना 10जीबी मोफत 4जी डाटा दिला जात आहे. यामुळे जिओ ग्राहक आता प्रतिदिन मिळणार्‍या इंटरनेट डाटा खर्चाची चिंता न करता लाइव्ह टीव्ही पाहू शकणार आहेत. रिलायन्स जिओ कोणताही अतिरिक्त भार न लावता ही सुविधा देत आहे. 
 
रिलायन्स जिओला 2018 चा प्रतिष्ठित ग्लोबल मोबाइल (ग्लोमो) पुरस्कार मिळाला आहे. बर्सिलोना येथे आयोजित मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये मिळालेल्या पुरस्काराचा आनंद ग्राहकांसोबत शेअर करत जिओने 10 जीबी डाटा फ्री देण्याची घोषणा केली आहे. पण ही ऑफर फक्त प्राइम  मेम्बर्ससाठी आहे. 
 
जिओने मेसेज आणि अ‍ॅप नोटिफिकेशनच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 
 
मेसेजमध्ये लिहिण्यात आले आहे की, 'जिओ टीव्हीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसध्ये बेस्ट मोबाइल व्हिडिओकंटेंटचा प्रतिष्ठित ग्लोबल मोबाइल अवॉर्डस 2018 जिंकला आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही तुमच्या अकाउंटवर 10जीबी कॉम्प्लिमेंटरी डाटा अ‍ॅड करत आहोत.'