आपल्या स्मार्टफोनमध्ये या प्रकारे जतन करा Instagram Reels
सोशल मीडियावर सक्रिय असणार्यांसाठी फोटो शेअरींग अॅप इंस्टाग्राम रील्स फीचर खूप आवडीचं असून यावर शॉर्ट स्टाइल व्हिडिओ तयार करता येतात. टिकटॉकवर बॅन लागल्यानंतर इंस्टाग्रामने आपल्या या फीचरची घोषणा केली होती.
इंस्टाग्राम रील्स फीचरमध्ये व्हिडिओ डाउनलोड करुन शेअर करणे इतकं सोपं नाही. म्हणून आम्ही आपल्याला इंस्टाग्राम रील्सच्या व्हिडिओला अॅड्रॉयड आणि आयफोनवर कशा प्रकारे डाउनलोड करता येईल याची सोपी पद्धत सांगत आहोत-
Instagram Reels ला Android वर जतन करण्यासाठी
Instagram Reels ला अॅड्रॉयड डिव्हाइसवर सेव्ह करण्यासाठी आपल्याल थर्ड पाटीची गरज पडेल. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर आढळणार्या Video Downloader for Instagram अॅप डाउनलोड करावं लागेल.
हे डाउनलोड केल्यानंतर उघडून सेटअप करा.
अॅप सेटअप झाल्यावर इंस्टाग्राम अॅप पुन्हा उघडा.
येथे रील्स व्हिडिओ निवडा.
आपण डाउनलोड करु इच्छित असलेला व्हिडिओ ओपन करा.
ओपन झाल्यावर तीन डॉट असलेल्या आयकॉनवर टॅप करुन लिंक कॉपी करा.
आता डाउनलोड केलेल्या अॅपला उघडून त्यात कॉपी यूआरएल पेस्ट करा.
आता गॅलरीत व्हिडिओ सेव्ह होईल.
आपण याला शअेर देखील करु शकता.
Instagram Reels ला iPhone वर जतन करण्यासाठी
Instagram Reels ला आयफोनवर जतन करण्यासाठी अॅप स्टोअरहून InSaver for Instagram अॅप डाउनलोड करा. एकदा अॅप इंस्टाल झाल्यावर इंस्टाग्रामच्या त्या जतन करु इच्छित असलेल्या रील्स व्हिडिओवर जा. येथे तीन डॉटवर क्लिक करुन लिंक कॉपी करा. आता InSaver for Instagram अॅप उघडून लिंक पेस्ट करा. यानंतर वॉच इटवर टॅप करा. नंतर पर्यायमध्ये जाऊन शेअरवर टॅप करुन व्हिडिओला फोटो अॅपमध्ये जतन करा.