गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (10:40 IST)

एकदा पाहाच, आनंद महिंद्रा यांचा प्रेरणादायी टि्वट

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आता त्यांच्या टि्वटर हँडलवरुन एक कबड्डीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या कबड्डी सामन्याच्या या व्हिडीओमध्ये चढाईपटू प्रतिस्पर्धी संघातील बचावफळीतील एका खेळाडूला बाद करतो. त्यानंतर चढाईपटू लगेच आपल्या क्षेत्रात निघून जाण्याऐवजी मध्यरेषेच्या जवळ उभा राहतो. त्यावेळी बाद झालेला खेळाडू चालत चढाईपटूच्या दिशेने जातो. खरंतर चढाईपटूची बाजू वरचढ असते. बाद झालेल्या खेळाडूला फारशी संधी नसते. पण बाद झालेला खेळाडू चढाईपटूला आत खेचताच बचावफळीतील अन्य कबडीपट्टू चढाईपटूची कोंडी करुन त्याला बाद करतात. काही क्षणांपूर्वी अशक्य वाटणारी एक गोष्ट शक्य होते. हाच या व्हिडीओ मागचा खरा अर्थ आहे.
 
“कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नका. कारण अपयशाला सुद्धा यशामध्ये बदलता येते. प्रो कबड्डी लीगमध्ये असे स्टंट फारसे पाहायला मिळालेले नाहीत” असे आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या टि्वटच्या संदेशामध्ये म्हटले आहे.