शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (18:05 IST)

हायब्रीड वॉरफेयर चे शस्त्र बनवून उदयास आला आहे डेटाचा वापर

नवी दिल्ली - हायब्रीड वॉरफेयर हा शत्रूंशी लढण्याची एक नवीन काळाची पद्धत आहे. या युद्धात डेटाचे खेळ असतात आणि त्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर शत्रूंच्या विरोधात खेळतात.  
 
 त्या डेटाच्या मदतीने आपण शत्रूंच्या देशात चुकीची माहिती पसरवून हिंसा आणि तणावाच्या परिस्थितीला जन्म देता. आपला  शेजारील देश आजकाल हेच करीत आहे, परंतु भारताने माहितीच्या योग्य वापर करून त्याला योग्य उत्तर दिले आहे. या गोष्टी मेजर जनरल(सेवानिवृत्त) ध्रुव कटोच ह्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी)च्या सैन्य अधिकाऱ्यांसाठी आयोजित मीडिया कम्युनिकेशन कोर्सच्या समापन समारंभात ह्यांनी या गोष्टी म्हटल्या.
 
मेजर जनरल कटोच म्हणाले की ,'' आपलं शेजारी देश आता माहितीच्या मदतीने युद्ध लढण्याचा प्रयत्न करीत आहे''. पण मला विश्वास आहे की अशा प्रकाराच्या 'हायब्रीड वॉरफेयर 'चा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सक्षम आहे.''
 
ते म्हणाले की आपण ज्या काळात जगत आहोत, त्या काळात माहितीची भूमिका महत्त्वाची आहे. आपण मीडिया मॅनेज करू शकत नाही, आपण केवळ माहितीच व्यवस्थापित करू शकतो.
कटोच म्हणाले की नवीन मीडियाच्या या युगात समाजातील प्रत्येक घटकांसाठी मीडिया साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे.
 
आज,जेव्हा जवळ जवळ प्रत्येक व्यक्तीच्या हातात एक स्मार्टफोन आहे, तेव्हा मीडियाच्या गैरवापर होण्याची शक्यता वाढली आहे आणि हे केवळ मीडिया साक्षरतेच्या माध्यमातून नियंत्रणात येऊ शकत .
कटोच म्हणाले, की मीडिया साक्षरतेमुळे आपल्याला मनोवैज्ञानिक युद्धाशी लढा देण्यात मदत मिळेल, ज्याला संपूर्ण जगभरात बघत आहोत. आपण भारत विरोधी शक्तींनी एक साधन म्हणून स्वीकार केल्या जाणाऱ्या मनोवैज्ञानिक युद्धात सजग राहायला पाहिजे.        
 
आपल्याला हे शिकावे लागणार की देशासाठी आणि देशवासीयांच्या उन्नतीसाठी मीडियाची शक्तीचा वापर कसा करावा.  
 
या वेळी आयआयएमसीचे महासंचालक प्रो. संजय द्विवेदी म्हणाले की, आपल्या देशात सैन्याला नेहमीच सन्मानाने आणि अभिमानाने बघितले जाते.म्हणून सर्व सैन्य अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की 
आपल्या संभाषण कौशल्याने आणि संचार माध्यमांचा योग्य वापर करून भारतीय सैन्याची ती प्रतिमा कायम ठेवा.
 
प्रो. द्विवेदी म्हणाले की २१ व्या शतकात 'इंटरनेट आणि सोशल मीडिया' या काळाचे शतक मानले जाते. आज फेक न्यूज स्वतःमध्ये एक मोठा व्यवसाय झाला आहे आणि डिजीटल मीडियाने  ह्याला प्रभावित केले आहे.
 
हे लक्षात घेण्यासारखे आहे की आयआयएमसी दरवर्षी सैन्य अधिकाऱ्यांसाठी मीडिया आणि संप्रेषणाशी संबंधित अल्प मुदतीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करते. या अभ्यासक्रमांमध्ये कॅप्टन स्तरांपासून ब्रिगेडियर स्तरावरील अधिकारी भाग घेतात. कोरोनामुळे, या वर्षी हा प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला आहे.
 
या वर्षी सार्वजनिक मीडियापासून नवीन मीडिया आणि आधुनिक संचारचे तंत्राची माहिती सैन्य अधिकाऱ्यांना पुरविली आहे. या शिवाय नव्या मीडियाच्या युगात सैन्य आणि मीडियाच्या संबंधांना सुधारू शकतात, ह्याचे प्रशिक्षण देखील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. (इंडिया सायन्स वायर)