मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (12:46 IST)

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. कंपनीने हे फीचर्स एंड्रॉयड आणि आयओएस दोघांसाठी सादर केले आहे. यात काही फीचर्स अद्यापही व्हाट्सएपच्या बीटा वर्जनसाठीच आहे. येथे आम्ही तुम्हाला त्या फीचर्सबद्दल सांगत आहोत जे लेटेस्ट असून त्यांचा वापर कसा होतो हे सांगत आहोत.  
 
फेसबुक स्टोरी इंटिग्रेशन
व्हाट्सएप यूजर्स जे स्टेटस टाकतात ते आता सरळ फेसबुक स्टोरीजवर देखील शेअर करू शकतील. त्यासाठी त्यांना स्टेटसच्या खाली एक ऑप्शन देण्यात येईल. ज्याच्या माध्यमाने ते सरळ फेसबुक स्टोरी बनवू शकतील.  
 
फिंगरप्रिंट अनलॉक
व्हाट्सएप फिंगरप्रिंट अनलॉक एंड्रॉयड आणि आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरच्या माध्यमाने यूजर्स फिंगरप्रिंट लॉक लावू शकतात. हा  फीचर व्हाट्सएपच्या सेटिंगमध्ये उपस्थित आहे.  
 
फॉरवर्ड
स्पॅम मेसेजला थांबवण्यासाठी या फीचरला तयार करण्यात आले आहे. जर कोणाचा फॉरवर्ड केलेला मेसेज तुम्ही पुढे पाठवता तर त्या मेसेजवर फॉरवर्डेड मेसेज लिहून येते. या फीचरला थोड्या दिवसाआधीच लाँच करण्यात आले आहे. 
 
लागोपाठ वॉयस मेसेजेस 
जर एखादा यूजर तुम्हाला बरेच वॉयस मेसेज पाठवतो तर ते तुम्हाला एक एक करून ऐकायची गरज नाही. तुम्ही लागोपाठ एकानंतर एक त्या वॉयस मेसेजेसला ऐकू शकतात.  
 
ग्रुप इनविटेशन
जर तुम्हाला एखाद्या ग्रुपशी जुळायचे नसेल तर तुमच्यासाठी हा फीचर फारच महत्त्वपूर्ण आहे. या फीचरच्या माध्यमाने तुम्ही नोबडी ऑप्शनची निवड करू शकता. अशात ग्रुप इनविटेशन तीन दिवसांमध्ये आपोआप संपेल.