बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 एप्रिल 2018 (16:04 IST)

युट्युबने सुमारे ५ मिलियन व्हिडिओ केले डिलीट

युट्युबने अलिकडेच सुमारे ५ मिलियन व्हिडिओ डिलीट केले आहेत. हे व्हिडिओज २०१७ च्या शेवटच्या तीन महिन्यात अपलोड केलेले आहेत. गुगल द्वारे अधिकृत व्हिडिओ शेअरिंग प्लेटफार्मने हे व्हिडिओज बघण्यापूर्वीच डिलीट केले. अनुचित कंटेंट पोस्ट केल्यामुळे कंपनीला खूप काळापर्यंत टिकेला सामोरे जावे लागले होते. याबाबत युट्युबने एका रिपोर्टमधून सांगितले की, ८० लाखात ७६% व्हिडिओजला १ व्हिव्यू मिळण्यापूर्वी डिलीट करण्यात आले.

युट्युबवर एकूण सुमारे ९३ लाख व्हिडिओज असे आहेत जे युट्युब गाईडलाईन्सचे उल्लंघन करत आहेत. यातील अधिकतर व्हिडिओज भारतात आहेत. या क्रमवारीत अमेरिका दुसऱ्या आणि युके सहाव्या स्थानावर आहे. युट्युबवर ३०० कंपन्या आणि संघटनांनी आपत्तीजनक कंटेंट सोबत त्यांच्या जाहिराती दिसत असल्याने तक्रार केली होती. यात एडिडास, अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स इत्यादींचा समावेश आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी व्हिडिओज रिमूव्ह करण्यात आले.