शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: रविवार, 9 एप्रिल 2023 (14:22 IST)

शिक्षक आणि विद्यार्थी जोक

joke
शिक्षक आणि विद्यार्थी जोक- जन्म कुठे झाला 
सर: सांग मन्या  तुझा जन्म कुठे झाला?
मन्या: औरंगाबाद
सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं…
मन्या थोडा विचार करतो
आणि म्हणतो “नाही, नाही…. माझा जन्म पुण्यात झाला…
 
 
सर – किती निर्लज्ज आहेस तु पक्या  ?
तू100 पैकी फक्त 5 गुण मिळवले
आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा?लाज वाटत नाही तुला 
पक्या - सर , मी हसत आहे कारण
उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहिले होते 
तर मग हे 5 गुण आले कुठुन.
 
शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, ‘आळस म्हणजे काय?’
बंडू ने चारही पानं कोरी ठेवली आणि 
शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
‘यालाच म्हणतात आळस.’
 
शिक्षिका - जो माझ्या प्रश्नाचे उत्तर देईल 
त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल !!
मन्याने लगेच आपली बॅग वर्गा बाहेर फेकली ..! 
शिक्षिका- ती बॅग कोणी फेकली ?
मन्या- मी फेकली !
आता मी घरी जाऊ ?
 
गणूच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे अधिकारी येतात. 
विज्ञानातील पुस्तकातल्या एका प्राण्याचे 
नुसतेच पाय दाखवून मन्याला तो प्राणी ओळखायला सांगतात.
गणू : काय ओळखायला येत नाही सर
अधिकारी  : मुर्खा, एवढं सोपं असूनही 
ओळखता येत नाही? नाव काय तुझं?
गणू : माझे पाय बघा आणि तुम्हीच सांगा