शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मार्च 2019 (08:53 IST)

कॉंग्रेसकडून राज्यात या नेत्यांची उमेदवारी पक्की होणार

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दुसरी यादी जाहीर करणार आहे. यादीत महाराष्ट्रातील १२ नावांचा समावेश असणार आहे. दिनांक ७ मार्च रोजी काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा समावेश होता. आता जाहीर होणाऱ्या यादीतील महाराष्ट्रातील १२ संभाव्य नावं समोर येत असून या नावांवर शिक्कामोर्तब होईल का हे पहावं लागणार आहे. नावे अशी असतील नंदुरबार – के सी पाडवी ,धुळे – रोहिदास पाटील ,रामटेक – मुकुल वासनिक ,हिंगोली – राजीव सातव, नांदेड – अमिता चव्हाण, सोलापूर – सुशीलकुमार शिंदे ,गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी, वर्धा- चारुलता टोकस, यवतमाळ – माणिकराव ठाकरे, मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा ,मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त, दक्षिण-मध्य – एकनाथ गायकवाड/वर्षा गायकवाड असे असणार आहेत.