गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:00 IST)

येत्या २६ एप्रिलला मोदी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता

The possibility of applying for the nomination form
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा उमेदवारी अर्ज २६ एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज वाराणासीतून दाखल करणार आहेत. भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २५ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात पोहचतील. त्यानंतर तिथे ते रोड शो करतील. त्याचप्रमाणे बनारास हिंदू विद्यापीठालाही भेट देतील असे समजते आहे. रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काळभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतील तिथे पूजा अर्चा करतील त्यानंतर गंगा आरतीही करतील. तसेच २५ एप्रिलचा उर्वरित दिवस ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत घालवतील असेही समजते आहे. कदाचित ते पत्रकारांशीही संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.