सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (18:25 IST)

मतदान मोजणी केंद्रात स्मार्ट घड्याळ पोलिसांनी केले अटक

नाशिकमध्ये दिंडोरी लोकसभा मतमोजणी ठिकाणी प्रतिनिधी स्मार्ट वॉच घऊन जाताना पोलिसांच्या तपासणीस सापडले. त्‍यानंतर त्याच्यावर अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अटक केलेल प्रतिनिधी हा तुकाराम हिरामण जोंधळे ( वय २९) रा. जवुळके ता. दिंडोरी येथील असुन जवुळके येथील सरपंच आहे. 
या घटनेत नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार होते. दिंडोरी लोकसभा मतमोजणी साठी जाणाऱ्या प्रवेशद्वारावर प्रतिनिंधींची तपासणी करत असतांन भाजपा पक्षाचे जोंधळे याच्या हातात स्मार्ट वॉच आढळून आले. या स्मार्ट वॉच मध्ये मोबाईल सुविधा होती. या दवारे जोंधळे बोलू शकणार होता.