सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

कॉंग्रेसच्या भूमिकेचे पवारांकडून स्वागत

द्रात सत्ता स्थापनेसाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याच्या कॉंग्रेसच्या आवाहनाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे.

पवार म्हणाले, की डावे पक्ष हे धर्मनिरपेक्ष गटाचेच भाग आहेत, हे अखेर कॉंग्रेसने मान्य केल्याचेच हे लक्षण आहे. कॉंग्रेसने सत्य स्वीकारले आहे, हा सकारात्मक संकेत आहे, त्याने आम्हाला आनंद झाला आहे.

डाव्या पक्षांना संयुक्त पुरोगामी आघाडीत आणण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. त्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा ही त्यांची सातत्याने मागणी होती.