मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

तिसरी व चौथी आघाडी सत्तेची हाव- सोनिया

कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज तिसर्‍या आणि चौथ्या आघाडीवर जोरदार टीका करताना या दोन्ही आघाड्यांना सत्तेची हाव आहे, आणि सत्ता मिळविणे एवढेच त्यांचे ध्येय आहे गरीबांच्या कल्याणाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही, अशा शब्दांत त्यांनी या आघाड्यांवर कोरडे ओढले.

येथील रामलीला मैदानावर झालेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. श्रीमती गांधी म्हणाल्या, हे सर्व पक्ष व आघाड्यांचे कोणत्याही किमतीत सत्ता प्राप्त करणे हेच ध्येय आहे. कॉंग्रेसला मात्र सत्तेशिवायही लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे.

या आधीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारची संभावना 'काळा कालखंड' अशी करून या सरकारने धर्म व जातीच्या नावावर समाजात द्वेष निर्माण करण्याखेरीज काहीही केले नाही, अशी टीका करून या सरकारच्या काळात देशाच्या सीमा असुरक्षित होत्या, अशी टीका केली.