सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

मनमोहन हेच होतील 'पीएम'- सोनिया

संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीला मिळालेल्या यशाने उत्साहित कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतदारांचे आभार मानत, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हेच असतील, हे स्पष्ट केले.

विजयानंतर प्रथमच माध्यमांसमोर जाताना अतिशय आनंदीत असलेल्या सोनियांनी हा विजय म्हणजे आपल्या सरकारच्या धोरणांचा विजय असल्याचे म्हटले. आम्ही केलेल्या विकासकामांना जनतेने दिलेली पावती असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेने दिलेल्या कौलाबद्दल धन्यवाद देत त्या म्हणाल्या, आम्ही दिलेली सर्व वचने पूर्ण करू. युपीएने कठोर मेहनत केली आहे आणि यापुढेही करत राहू.