राहुलसाठी कॅबिनेटमध्ये पायघड्या
संयुक्त पुरोगामी आघाडीला निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळाले असून कॉंग्रेसतर्फे सत्ता स्थापनेसाठी दावा केला जाणार आहे. या सरकारमधील कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिमंडळात राहुल गांधी यांना स्थान दिले जाणार असल्याचे संकेत डॉ.मनमोहन सिंह यांनी दिले आहे. संपुआने जनतेला दिलेले सर्व आश्वासन पूर्ण केल्यानेच हा विजय मिळाला अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.