सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

'आता मनमोहनच, भविष्यात राहुल पंतप्रधान'

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पंतप्रधानपदी आता मनमोहनसिंगच राहणार असून भविष्यात राहूल गांधी यांचा विचार होईल, असे कॉंग्रेसने स्पष्ट केले.

संयुक्त पुरोगामी आघाडीने सर्वात जास्त जागा मिळविल्या असून सरकार स्थापनेसाठीही दावा करणार आहे. आता पंतप्रधानपदी डॉ.मनमोहनसिंग यांची निवड होणार असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे महासचिव जनार्दश द्विदेदी यांनी सांगितले. परंतु भविष्यात राहुल गांधी हे कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले.