मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

'आरएसएस' हा व्याभिचारींचा गट- लालू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा व्याभिचारी लोकांचा गट असल्याची जहरी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.

संघाचे लोक आपण ब्रह्मचारी असल्याचे म्हणतात. पण प्रत्यक्षात ते व्याभिचारी असतात, असेही लालू म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून लालू वादग्रस्त विधाने करत आहेत. वरूण गांधी यांना रोडरोलर खाली चिरडावे हे विधान केल्यानंतर त्यांची पत्नी राबडी देवी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार व सेक्युलर जनता दलाचे अध्यक्ष ललन सिंग हे एकमेकांचे 'साले' (मेव्हणे) असल्याची टीका केली होती. लालू व राबडी यांच्या या विधानांवर निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवून दोघांनाही तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता.