सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

उद्धव यांच्याशी चर्चेचे पवारांकडून खंडन

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याच्या वृत्ताचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केले आहे.

ही खोटी बातमी असून उद्धव सध्या कुठे आहेत हे मला माहित नाही, असे त्यांनी सांगितले. पवार व उद्धव यांच्यात परदेशात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या नव्या युतीचा पाळणा हलतो की काय यावर चर्वितचर्वण सुरू झाले आहे. या चर्चेला आणि अर्थातच शिवसेनेला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपने तातडीची बैठकही बोलावली होती आणि दुसरीकडे मनसेशी आघाडीची चाचपणीही सुरू केली होती.

यापूर्वी निवडणुकीपूर्वी शिवसेनेने उघडपणे पवारांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा दिला होता. त्यावेळीच शिवसेना व राष्ट्रवादी युतीची चाचपणीही झाली होती. मात्र, ती प्रत्यक्षात उतरू शकली नव्हती. आता मात्र, निवडणुकीनंतर पवारांना पंतप्रधान करण्यासाठी म्हणून शिवसेना राष्ट्रावादी मागे उभी रहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव व पवार यांच्यातील कथित संभाषण हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जातेय.